बहुजन विद्यार्थी संघटनेचा भव्य मेळावा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क, व अधिकारांसाठी लढणार्‍या बहुजन विद्यार्थी संघटनेचा रायगड़ जिल्हा मेळावा जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वात व खालापूर तालुका अध्यक्ष आकाश केदारी व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विश्‍वशांती बुद्धविहार क्रांतीनगर येथे नुकताच पार पडला.

यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा महासचिव प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमित गायकवाड, उपाध्यक्ष निशांत पवार, योगेश गायकवाड, तसेच जिल्हा संघटक जगदीश वाघमारे, पनवेल तालुका अध्यक्ष प्रशिक भगवान बिनेदार, सुधागड तालुका अध्यक्ष र्वीेंलरींश सुशील गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष आकाश केदारी, पेण तालुका अध्यक्ष नागेश सुर्वे,कर्जत तालुका अध्यक्ष कल्पेश गायकवाड,कर्जत शहर अध्यक्ष सुजल गायकवाड, अलिबाग तालुका अध्यक्ष संजय जाधव, रोहा तालुका अध्यक्ष प्राध्यापक गणेश कांबळे, महाड तालुका अध्यक्ष- नितेश हाटे आदींसह , सुदिन शिर्के, अल्पेश शेलार, सुजित शेलार, मितेश गोतारने, जिल्हा उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थीत होते.

Exit mobile version