| अलिबाग | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरडी कोसळून मृत्युमुखी झालेल्या नातेवाईकांची वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांनी भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच तहसीलदार खालापूर यांच्याबरोबर मयत झालेल्या व त्यांच्या नातेवाईकांच्या आकडेवारीसंदर्भात चर्चा केली. तहसीलदारांना जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांनी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाच्यावतीने वस्त्र व धान्याचे वाटप करू, असे जाहीर केले. यावेळी रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारे, जिल्हा संघटक आशिष जाधव, सागर गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव, कार्यकारिणी अलिबाग तालुका उपाध्यक्ष साईनाथ म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.