| मुंबई | प्रतिनिधी |
सुमुद्राखालून केबल टाकून महावितरणने घारापुरी बेटावर विद्युतीकरण करण्यात आले होते, मात्र चार केबल्स पैकी दोन केबल्स नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने अथक प्रयत्न करुन अखेर वीज पुरवठा पुर्ववत केला.
समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील बिघाड शोधणे आणि ती दुरुस्त करणे फार अवघड होते. सतत पडणारा पाऊस, वादळी वातावरण, खवळलेला समुद्र, समुद्राचा तळामध्ये असलेला पाण्याचा दाब आणि पाण्याखाली वाहणारे प्रवाह यामुळे आव्हान अधिकच कठीण होते. आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणने हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या 37 दिवसांचा अथक प्रयत्नांमुळे एका नादुरुस्त केबल्सचा दोष काढून केबल चालू करण्यात आली व घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.