| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील मढाळी बु. शाळेला संगणक संच व क्रीडा साहित्याची भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे फादर फिलिफ व त्यांच्या अर्धांगिनी बिबी टीचर यांच्या माध्यमातून शाळेला संगणक क्रिकेट हॉलिबॉल, शटल कॉक सेट, टेनिस बॉल, फूटबॉल, दोरी, चेस, कॅरम बोर्ड, लेझिम, लुडो, असे विविध इनडोअर व आऊट डोअर खेळाचे साहित्य व आदिवासी भाषेत अनुवाद केलेले दहा पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. यामध्ये ग्रेगोरियन शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक धनंजय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शाळा व्यवस्थापन स. अध्यक्ष सुरेखा कोळी यांनी आपले मत व्यक्त करताना शाळेमध्ये होत असलेली प्रगती व बदलाचे कौतुक केले. तर, श्रीयुत सावंत यांनी शिक्षक हा शाळेचा कणा आहे, त्यामुळे त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावे, असे मत मांडले. शाळेची प्रगती उत्तरोतर होत राहो, अशा शुभेच्छही दिल्या. यावेळी ग्रेगोरियन शाळेची सर्व टीम व उपाध्यक्ष पिंकी पवार तसेच डोलवहाल श्रीयुत सावंत, गोपीनाथ वाघमारे, योगेश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ आब्दागिरे यांनी केले. तर, मान्यवरांचे आभार सुजाता कांबळे यांनी मानले.