| आपटा | वार्ताहर |
संवेदना डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या समन्वयाने आणि डॉ. विदुला सोमण यांच्यातर्फे अंगणवाडीतील 32 मुलांना शालेय गणवेश, दप्तर आणि खाऊचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दि. 18 सप्टेंबर रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंगणवाडी सेविका आशा माळी यांनी डॉ. विदुला सोमण, मोहिनी बागडे आणि इंदू खुडे यांचे पुष्पगुच्छ आणि शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर संवेदना डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या मोहिनी बागडे यांनी मुलांना चांगल्या सवयी आणि गुड टच- बॅड टचविषयी मार्गदर्शन केले. याविषयी बोलताना मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला वावेघर अंगणवाडी सेविका आशा माळी, मदतनीस इंदू माळी, वावेघरमधील समाजसेविका इंदू खुडे, डॉ. विदुला सोमण आणि मोहिनी बागडे यांच्यासह काही पालकांचीसुद्धा उपस्थिती होती.