| नवी मुंबई | प्रतिनिधी |
हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सत्याग्रह महाविद्यालयात हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वेळात शांताबाई रामराव सभागृह, सत्याग्रह कॉलेज, सेक्टर-7, खारघर, नवी मुंबई येथे एका राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे निमंत्रक प्रा.डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेशाचा भविष्यकालीन विकास तथा विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठीचे मनुष्यबळ: संधी, आव्हाने आणि डावपेच या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे उद्घाटन पूज्य भदंन्त डॉ. उपगुप्त महाथेरो करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जे.पी. डांगे (माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन), आर.के. गायकवाड (माजी आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या परिसंवादात प्रा. व्यंकट माने, डॉ. प्रज्ञा डोंगरगावकर, डॉ. प्रतिभा कांबळे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, अॅड. अजिंक्य शाक्य, प्रा. प्रियंका गायकवाड, डॉ. अनिल पांडे, डॉ. वाय.के. ठोंबरे, प्रा. मिलिंद ठोकळे, प्रा. रमेश सोनकांबळे, डॉ.प्रा. विजय मोरे सहभागी होणार आहेत.