| कर्जत | प्रतिनिधी |
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कर्जत आयोजित माजी आमदार तुकाराम स्वर्गीय सुर्वे प्रतिष्ठान, दादर-मुंबईतील ज्योविस आयुर्वेद, नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या चिकित्सा शिबिरात 278 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रतिष्ठानने आयोजित केलेले 28 वे आरोग्य शिबीर होते.
या शिबिराचे उद्घाटन ज्योविस आयुर्वेदाचे डॉ. राज सातपुते यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जोशी, सदानंद जोशी, अभिजीत मराठे, मंगेश जोशी, निलेश परदेशी, डॉ. ज्योती सातपुते, डॉ. मणिशंकर गुप्ता, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे आदी उपस्थित होते. अमित मराठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या शिबिरात डॉ. राज सातपुते, डॉ. मणीशंकर गुप्ता यांच्यासह रोहित जाधव, मिकी सिंग, आरती गाते, सौम्या गुप्ता, मनीषा मीना, सत्यशील मौर्या, अभय दुबे, सौरभ कुशवाह, प्रिया उमर, कोमल सोलंके, आदिती गायकवाड, अभय ठोंबे, कृतूजा पोटे, दत्ता गिरम, नेहा कदम, वासंती साळगावकर, विनिता म्हाडी यांनी आरोग्य सेवा दिली. चामखीळ आणि भोवरी हे तात्काळ काढण्यात आले तर पित्त, पाठदुखी, वात, रक्त मोक्षण, आमवात, अग्निकर्म, लकवा आजाराचे रुग्ण यांची चिकित्सा करण्यात आली. बहिरेपणा, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आदी व्याधींवर उपचार करण्यात आले. 278 रुग्णांची तपासणी आणि चिकित्सा करण्यात आली. या सर्व रुग्णांना मुंबई येथील नारी सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून सर्व औषधे मोफत देण्यात आली.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक बाबू धबडे, वसंत ठाकूर, भानुदास ठोंबरे, आयेशा वाडकर, ज्योती पाटील, वैशाली ठाकरे, विजयकुमार गोखले, पांडुरंग देशमुख, वसुधा ठाकूर, यश सुर्वे, रघुनाथ खैरे, धनंजय बेडेकर, योगेश देशमुख, अरुण निघोजकर, पद्मजा देशमुख, शिल्पा कदम आदी उपस्थित होते.