| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावचे रहिवासी असणारे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शांताराम भोईर यांचे शुक्रवार, दि.13 सप्टेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी वयाच्या सुमारे 55 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी रविवार, दि.22 सप्टेंबर रोजी, तर अंतिम धार्मिकविधी मंगळवार, दि.24 सप्टेंबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.