| कोलाड | वार्ताहर |
गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्तात यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, दि.21 सप्टेंबर रोजी वरसगाव पद्मावती नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त सकाळी 9 वाजता सत्यनारायणाची महापूजा, सकाळी 11 वाजता तुकाराम वस्तात यांचे जीवनचरित्र वर्णन पुरोहित महेश जंगम यांच्या हस्ते, दुपारी 12 वा. शक्तीवाले शाहीर संतोष कांबळे जाखमाता मायावती शिवशक्ती नाच मंडळ शिस्ते ता. श्रीवर्धन विरुद्ध तुरेवाले शाहीर वसंत भोईर (रायगड भूषण) वीर हनुमान नाच मंडळ, तिसे, ता. रोहा यांच्या नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत आंब्रूस्कर, सुरेश आंब्रूस्कर, अजित आंब्रूस्कर, अमर आंब्रूस्कर, ग्रामस्थ मंडळ वरसगाव पद्मावती नगर, सापया वरसगाव क्रीडा मंडळ, गावठाण, श्री गणराज मित्रमंडळ, सापया क्रीडा मंडळ, तरुण वर्ग व महिला मंडळ वरसगाव मेहनत घेत आहेत.





