| रसायनी | वार्ताहर |
रसायनी चावणे गावचे भूमिपुत्र, समाजसेवक, एस.पी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे रायगड जिल्हा प्रमुख, एस.पी. कन्स्ट्रक्शनचे मालक आणि एस. पी. फिटनेसचे सर्वेसर्वा युवा उद्योजक सचिन यशवंत पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरा केला जातो. यावर्षी ही मुरबाड येथील तारांगण मतिमंद अनाथ आश्रम येथे कुटुंबासोबत जाऊन त्या मतिमंद मुलांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. तसेच त्यांना कपडे, वह्या, शालेय बॅग, खाऊ, नेलकटर, रंगीत खडू, पेन्सिल, शॉपणार, कंगवा असे उपयोगी सामान दिले. असा आगळावेगळा कार्यक्रम करून त्या मुलांच्या चेहर्यावरचा आनंद द्विगुणित केला. यावेळी सचिन पाटील, फाऊंडेशनचे सचिव वैभव सुभाष विशे, सदस्य प्रशांत पाटील, शिल्पा विशे, प्रियंका पाटील, सान्वी पाटील व शाळेचे व्यवस्थापक विकास म्हारसे व त्यांचा स्टाप उपस्थित होता.