वैजनाथ शाळेस डिजिटल साहित्य भेट

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील खांब येथील किल्ले सुरगड पायथ्याशी वसलेल्या वैजनाथ गावच्या रायगड जिल्हा परिषद शाळा वैजनाथ येथे सामजिक बांधिलकीचे जतन करत सामाजिक, शैक्षिणक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने या शाळेला बदलत्या शिक्षणाचे धोरण लक्षात घेऊन डेल कंपनीचा लॅपटॉप तसेच त्याला लागणारे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच पालक आणि वैजनाथ ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती. यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे सभासद किशोर सावरकर, किशोरी सावरकर, मानशी पारठे, जितेश पारठे, निवृत्ती पवार, सुरगडाचे गडपाल महेंद्र पारठे यांच्या हस्ते शाळेतील मुलांना लॅपटॉप वाटत केले. वैजनाथ गावाचे ग्रामस्थ मनोज सावरकर, हेमंत महाबले, महादेव परबलकर, मनिषा मारुती सावरकर,निशा पवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोनिका बद्रिके, अश्विनी सावरकर, प्रियांका जाधव, सोनल पवार, राजेश्री घरट, निकिता चोरगे, दिया जाधव, सायली महाबले आणि मुख्याध्यापिका ममता रोहेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version