जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग किट भेट

| माणगाव | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लबच्या माजी अध्यक्षा काजल थडानी, संचालक आणि माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून 10 जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग किट व वह्या भेट स्वरूपात देण्यात आल्या. सदर कार्यक्रम 20 जून रोजी रा. जि. प. शाळा खांदाड येथे पार पडला.

या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा काजल थडानी, संचालक दत्ताराम शिंदे, माणगांव नगर पंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, डॉ. संतोष कामेरकर, शैलेश भोनकर, खांदाड शाळा समिती अध्यक्ष महेश पोवार, उपाध्यक्ष कैलास पोवार, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम पांडुरंग शिंदे व आरती दत्ताराम शिंदे हे माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे रहिवाशी आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक व सरकारी रुग्णालयात आवश्यक असणारी साधन व्यवस्थांची व मशनिरिंची त्यांना चांगली माहिती आहे. त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेऊन क्लबच्या सहकार्याने सेवाभावी काम करीत आहेत.

Exit mobile version