| चिरनेर | वार्ताहर |
देशाचा अमृत महोत्सव,संकष्टी चतुर्थी,श्रावणी सोमवार साधून चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरात भजन ,कीर्तन,वचन असा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी भजन सम्राट विकास बुवा यांना उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते हार्मोनियम ची भेट देण्यात आली. यावेळी उद्योगपती पीपी खारपाटील ,दिग्दर्शक वसंत चिरलेकर, माजी सभापती भास्कर मोकल, अरुण शिंद,गणपती देवस्थानचे विश्वस्त संतोष ठाकूर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ठाकूर यांनी केले कै.परशुराम खारपाटील व कै. ठकूबाई खारपाटील यांच्या स्मरणार्थ या भजन मंडळीला हार्मोनियमची भेट देण्यात आली.
भजनीमंडळींना हार्मोनियमची भेट
