आदिवासी वाड्यांना पाणी साठवण टाक्याची भेट

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कॅरींग फ्रेन्ड्स या संस्थेकडून माथेरान डोंगरातील दोन आदिवासी वाड्यांना पाणी साठवण टाकी भेट देण्यात आली. यापूर्वी या संस्थेने चार आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचे साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्या भेट दिल्या होत्या.

माथेरान मधील व्यवसायिक नितीन शहा यांच्या माध्यमातून प्रामुख्याने माथेरानचे पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये सामाजिक कार्य विविध संस्थांचे माध्यमातून सुरू असते.त्यातील कॅरींग फ्रेन्ड्स या संस्थेने जानेवारी महिन्यात आसलवाडी, धनगर वाडा, नाण्याचा माळ, खोंडा या ठिकाणी पिण्याच्या पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या भेट देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आदिवासी लोकांची मागणी लक्षात घेवून माथेरान डोंगरात असलेल्या धोधाणी या गावासाठी तसेच वाघाची वाडी या आदिवासी वाडीसाठी साठवण टाकी भेट देण्यात आली.पाच हजार लिटर क्षमता असलेल्या या टाक्या गावापर्यंत पोहचवून देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

Exit mobile version