गिलला कर्णधारपदाची कल्पना नाही: अमित मिश्रा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाची झिम्बाब्वे दौर्‍यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आले होते. भारतीय संघाने मालिका 4-1अशी जिंकली. या कामगिरीबद्दल गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक केले पाहिजे, पण भारतीय संघाचा भाग असलेल्या अमित मिश्राने गिलच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीत अमित मिश्राने रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत आणि भारतीय संघाशी संबंधित जवळपास सर्वच बाबींवर मोकळेपणाने बोलला आहे. यावेळी अमित मिश्राला गिलबाबत विचारण्यात आले की, शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुझे काय मत आहे. यावर तो म्हणाला की, मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर त्याला कर्णधार केले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधारपद कसे हाताळायचे हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही. अमित मिश्राच्या या वक्तव्यामुळे शुबमन गिलच्या कर्णधारपदावर थेट प्रश्‍न उपस्थित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version