। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील परहूर परिसरातील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना सोमवारी (दि.20) सायंकाळी घडली असून या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिमरन पाटील (17) असे या मुलीचे नाव आहे. परहुर येथील भाटावर एका झाडाला ओढणीने गळफास घेऊन ती बेशुद्ध अवस्थेत सोमवारी दुपारी दिसून आली. तिला तातडीने अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून अगोदरच ती मृत असल्याचे घोषित केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
