एनएमएमएस परीक्षेत मुलींनी मारली बाजी

| चिरनेर | प्रतिनिधी |

केंद्र शासनाच्या विद्यालयातील आर्थिक दुर्बल घटकामध्ये मोडणाऱ्या शाळेय विद्यार्थ्यांसाठी एन.एम.एम.एस परीक्षांचे नियोजन केले जाते. उरण पूर्व विभागातील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यालय असून देखील विद्यालयातील 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयातून एकूण 15 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 10 पैकी 9 मुलींनी बाजी मारली. तर मुलांपैकी एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयात मुलींनीच बाजी मारली, असे म्हटले जाते. विद्यालयाच्या प्राचार्या ए. ए. पाटील, एम.एस.पाटील, प्रा. डाढाळे बी. बी., एस. सी. पाटील, एस.आर. म्हात्रे, डी.आर.पाटील, सी. ए. घरत, वर्षा पाटील, कल्याणकर एन.बी, पाटील पी.एम या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे चेअरमन जीवन गावंड यांच्यासह उरण तालुक्यातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version