वरसई शाळेच्या मुलींची बाजी

| खरोशी | प्रतिनिधी |

पेण येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यात पु.न. गोडसे विद्या मंदिर वरसई शाळेतील 17 वयोगटातील खो-खो सामन्यात मुलींंनी उपांत्य फेरीत म.ना. नेने कन्या विद्यालयाचा 7-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच, अंतिम सामन्यात एस.एम. पाटील माध्यमिक विद्यालय वरवणे विद्यालयातील मुलींचा 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सहाय्यक शिक्षक आर.एम. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. तसेच राणी कदम, रोहन सोनगरे, नितीन मोरे, निलेश पाटील, प्रफुल्ल शिकवण, समीर व सुशील काईनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केले. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण काळे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.

Exit mobile version