पाल्यांना उच्च शिक्षण द्या – पोमन

दांडगुरी | वार्ताहर |
स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर उच्च शिक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा. स्पर्धात्मक परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगा असे आवाहन दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी केले. ते वडवली येथील नवरात्रौत्सव दरम्यान आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते.
वडवली गावातील आगरी समाजाकडून पोलिस पाटील दिलीप नाक्ती, माजी उपसरपंच दीपक कांबळे आणि सहा पोलिस निरीक्षक पोमन यांचे कृतज्ञता सत्कार आयोजित केले होते.
पोमन यांनी पोलीस पाटील दिलीप नाक्ती यांचे देखील विशेष कौतुक केले.उपसरपंच दीपक कांबळे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत अनेकदा मदतीला धावून येत समाजकार्य केले. विशेषतः कोरोना व लॉकडाऊन काळात ग्रामस्थ व प्रशासन दोघांचा योग्य समतोल राखत शासन नियमांची अंमलबजावणी यांनी केली. यावेळी वडवली आगरी समाज अध्यक्ष संतोष नाक्ती, उपाध्यक्ष किशोर बिराड यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चाळके यांनी अतिशय सुंदररीत्या केले.

Exit mobile version