बोकडवीरा दुर्घटनेतील मृतांच्या वारसाना नोकरी द्या

आ.जयंत पाटील यांची मागणी
| नागपूर | दिलीप जाधव |
उरण जवळील बोकडवीरा गावाजवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या वायू विद्युत केंद्रात झालेल्या भीषण स्फोटात एक कनिष्ठ अभियंता,एक तंत्रज्ञ व एक कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या वारसांना कायम स्वरूपी नोकरी दिली जावी,अशी मागणी शेकाप आ.जयंत पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्‍नावर बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले की या बोकडवीरा वायुविद्युत प्रकल्पात एका महिन्यात तीन स्फोट झाले आहेत.दुर्घटना घडल्यावर मी वीज केंद्रात पाहणीसाठी गेलो होतो त्यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.यामध्य वीज केंद्रातील स्टीम बॉयलरची देखभाल करण्यासाठी कुशल कामगार नसतात. तसेच या वीज केंद्राचे सेफ्टी ऑडीट केले वेळवर केले जात नाही, याची उच्चस्तरीय चौकशीची स्थापना करावी अशी मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सदरचा अपघात उरण येथील वायु विद्युत केंद्रातील बी-2 मध्ये झाला. यात स्टीम बॉयलरचा स्फोट झाला नसून बी2 बॉयलरच्या बीसीपी पंपामध्ये बिघाड होऊन ही दुर्घटना घडली आहे.यामध्ये तिघेजण दगावले आहेत.या घटनेची चौकशी करण्यासाठी महानिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून उच्च स्तरीय चौकशी समिति स्थापन करण्यात आली आहे . कनिष्ठ अभियंता यांच्या वारसास क़ायमस्वरूपी नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या कुटुंबियांना वारसा हक्क प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.शिवाय त्यांचे आर्थिक लाभ अंतर्गत भविष्य निधी,रजा रोखीकरण,गट विमायोजना,कामगार भरपाई रक्कम अदा केल्या आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. त्राटी कामगाराच्या वारसाना क़ायम स्वरूपी नोकरी देता येत नाही .तरीही विशेष बाब देता येईल का हे तपासून बघू असे आश्‍वासन यावेळी फडणवीस यांनी दिले

Exit mobile version