आरोग्य केंद्रासाठी इसीजी मशीन भेट

देवनार रोटरीचा स्तुत्य उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील 63 गावांमध्ये काम करणार्‍या देवनार रोटरी क्लब यांच्या माध्यमातून कळंब येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इसीजी मशीन भेट देण्यात आले. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी आणि ग्रामीण भागातील मातृ आरोग्य केंद्र समजले जाते आणि त्यामुळे दररोज येथे बाह्य तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी इसीजी मशीन महत्त्वाचे काम करणार आहे.

रोटरी का सॉफ देवनार यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील अनेक गावांत सामाजिक बांधिलकी जपत विविध कामे केली जात आहेत. गेली 15 वर्षात देवनार रोटरी क्लबकडून 63 गावांमध्ये शाळांसाठी सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, शुद्धजलव्यवस्था, सायकल वाटप, ई-लर्निंग सुविधा, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी प्रशिक्षण तसेच सेंद्रिय शेती प्रयोग केले जात आहेत.

दरम्यान, कळंब या आदिवासी भागासाठी इसीजी मशीन भेट देण्यात आले. रोटरी क्लब देवनारचे डिस्त्रोक्त गव्हर्नर राजू सुब्रमण्यमी यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत यादव यांनी स्वीकारले. यावेळी रोटरी देवनारचे डायरेक्टर कन्नन, लीलाधर पराडकर, श्री. जैसल, किुलभूषण जेटली, विद्या, अलका, पूजा, शिल्पा, नागेश भट यांच्यासह इसीजी मशीनचे टेक्निशियन यांच्यासह ग्रामीण रोटरी मंडळाचे समन्वयक अर्जुन तरे, बागडे, हनुमान बदे, दिनेश बदे, ज्ञानेश्‍वर खांडेकर, डॉ. रूपा सोनपट्टे आदी मान्यवर उवस्थित होते.

Exit mobile version