। नेरळ । वार्ताहर ।
मुंबई रोटरी क्लबच्या देवनार शाखेच्यावतीने कर्जत ग्रामीण रोटरी क्लब चालविली जात आहे. या संस्थेकडून तालुक्यात शाळांना संगणक, तसेच पाणी जलशुद्धीकरण संच,तसेच शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करीत आली आहे.कर्जत तालुक्यातील जांभिवली गौरकामात भागात असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यंसाठी पाण्यासाठी कूपनलिका आणि सोबत एळट्रिक पंपाने पाणी शाळेच्या आवरत आणून त्या ठिकाणी जलशुद्धीकरण संच देण्याचं सोहळा ग्रामीण रोटरी क्लब कडून आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पदमा कपूर,संजय मेहता,अर्जुन तरे, मारुती बागडे, संदीप तरे, प्रकाश सोनावले, सुदाम मसणे, दिनेश बदे, विठ्ठल बरे, सिताराम बदे, दशरथ मुने, शैलजा निकम उपस्थित होते.