। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विरोधात मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे असे युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट मुंख्यमंत्र्यांनाच आवाहन देत परस्पर महाडचे आ. भरत गोगावले यांना शिवसेनेचे विधीमंडळ मुख्य प्रतोद पद बहाल केले असून सुनिल प्रभु यांची उचलबांगडी केली आहे. तसेच सुनिल प्रभु यांनी बैठकिबाबत केलेले आदेश अवैध असल्याचेही त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा वाद चांगलाच चिघळला आहे.