। चिपळूण । वार्ताहर ।
भेंडी नाका येथे राहणारे सचिन लकेश्री यांनी महापुरामध्ये अडकलेल्या चौगुले कुटुंबियातील सहा जणांना प्राणाची बाजी लावून वाचविले. याबद्दल या कुटुंबीयांकडून त्यांचे देवदुतासारखे आभार मानले जात आहेत. याची दखल घेऊन अनेक संस्थांमार्फत सचिन लकेश्री यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सचिन लकेश्री राहत असलेल्या खेंड विभागातील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या समितीतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दादा खातू व जगदीश साडविलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे शैलेश जागुष्टे, गणेश दळी व सर्व पदाधिकारी,महिला प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश म्हापूसकर, तर आभार प्रदर्शन गणेश दळी यांनी केले.