टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा गौरव

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड पंचायत समिती येथील तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहामध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायत गुण गौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

मुरुड पंचायत समिती गटविकास अधिकारी -डॉ राजेंद्रकुमार खताळ , तालुका आरोग्य अधिकारी -डॉ. पायल राठोड,यांच्या शुभहस्ते तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा वळके, तळेखार , कोर्लई , बोर्ली, नांदगाव, वेलास्ते, वावडूंगी, शिघ्रे व आगरदांडा या ग्रामपंचायतींचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मृतिचिन्ह ,प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आणि आशा स्वयंसेविका यांचे यावेळी सन्मान करण्यात आला.

मुरुड तालुक्यातील 2023 मध्ये नऊ ग्रामपंचायतींना टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळ्यात कांस्यपदक मिळाले असून, उर्वरित 2024 मध्ये 24 ग्रामपंचायत या अभियानात यावर्षी सहभागी असून त्याही त्यांचा निकष पूर्ण करून पुढल्या वर्षी होणार्‍या कार्यक्रमात आपलं पारितोषिक मिळवतील अशी आशा यावेळी गट विकास अधिकारी -राजेंद्रकुमार खताळ यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी ग्रामपंचायत ना मिळालेले पुरस्कार पारितोषिक टिकवणे म्हणजेच गावातील संशयित क्षय रुग्णाचे प्रमाण व क्रियाशील रुग्ण याचा ताळमेळ ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. या उलट गावामध्ये क्षयरोगाचे रुग्ण वाढणार नाही याकरिता जास्तीत जास्त नागरिक त्यांची तपासणी करून घेतील आणि ग्रामपंचायत टीबी मुक्त ग्रामपंचायत असा बहुमान मिळवून टीबी हरेगा देश जीतेगा या नार्‍याचे खर्‍या अर्थाने सन्मान करतील अशी आपेक्षा व्यक्त केली.

याकार्यक्रमाची प्रस्तावना करताना वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक -संकेत घरत यांनी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पात्र होण्यासाठी जे निकष आहेत याबद्दल व क्षयरोगा विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र चुनेकर यांनी केले.

Exit mobile version