गो बॅक अदानी.. मुरुडमध्ये नारा

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरुड शहरातील महावितरण कार्यालया समोर अदानी हटाव देश बचाव, अदानी गो बॅक…, वीज उद्योजक खाजगी करणाचा जाहीर निषेध, एकी हेच बळ, विद्युत कंपन्यात राजकीय हस्तक्षेप बंद करा, अश्या प्रकारचे फलक घेऊन सर्व अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले. यावेळी उपकार्यकारी अधिकारी अभियंता महादेव दातीर, कनिष्ठ अभियंता विषाल इंगावले, सहाय्यक अभियंता राजेश गोरले, कनिष्ठ अभियंता प्रियंका सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता भरत पाटील, लिपिक धीरज पवार, वायरमन वसंत घोसाळकर, वायरमन राजेश वाघीरे, मयुर किल्लेकर, प्रधानतंत्रन्य- मंगेश किल्लेकर आदिंसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version