| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई येथील युनायटेड वेकडून अंभेरपाडा येथील ग्रामपंचायतमध्ये शेतकऱ्यांना शेळी पालन प्रशिक्षण देण्यात आले. तीन गावातील 14 शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आणि त्यांना 70 शेळ्या तसेच 14 बोकड पालनासाठी देण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अतिशय दुर्गम असलेल्या अंभेरपाडा ग्रामपंचायत येथील आदिवासीबहुल भागात जलसंजीवनी उपक्रम राबविला जातो. काठेवाडी, बेलाचीवाडी आणि अंभेरपाडा गावातील शेतकऱ्यांना युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा कार्यान्वयित आणि मेटलर टोलेडो अर्थसहाय्यित जल संजीवनी, कर्जत प्रकल्प अंतर्गत शेळी पालन प्रशिक्षण आणि वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रगतीशील शेतकरी आणि शेळीतज्ज्ञ संतोष धुमाळ यांनी शेतकऱ्यांनी केवळ पिकावर आणि उत्पन्नासाठी अवलंबून न राहता, शेळीपालनासारखे कमी खर्चिक परंतु प्रभावी शेतीपूरक जोड धंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तीन गावातील एकूण 14 शेतकरी सहभागी झाले होते. त्यात अंभेरपाडा 6 बेलाचीवाडी येथील 5 आणि काठेवाडी गावातील 3 लाभार्थी सहभागी झाले होते. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 शेळी आणि एक बोकड असे शेळी पालन उपक्रमांतर्गत वाटप करण्यात आले. यावेळी 70 शेळ्या आणि 14 बोकड वितरीत करण्यात आले.
शेतकऱ्यांना शेळी पालनाचे प्रशिक्षण
