वाघाचा बकरीवर हल्ला

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील चरई बुद्रुक येथे गुरुवारी (दि.4) रात्री संतोष काप यांच्या गोठ्यात पट्टेरी वाघ शिरून त्याने गोठ्यातील बकरीवर हल्ला केला. आवाज येताच संतोष काप यांच्यासह गावकरी गोठ्याच्या दिशेने धावले. परंतु, तेवढ्यात वाघ पळून गेला. यात बकरीचा मृत्यु झाला. तळा तालुक्यात घनदाट जंगलातून बिबट्या वावरत असताना अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. परंतु, पट्टेदार वाघ पहिल्यांदाच येथील ग्रामस्थांनी पहिला आहे. येथील ग्रामस्थांनी सांगीतले की, रात्रीच्या वेळी आम्ही वाघाला पाहिले, तो वयाने लहान म्हणजे दोन वर्षाचा असू शकतो. तसेच, आम्हाला पाहिल्यानंतरदेखील तो बराच वेळ जागेवरून हलत नव्हता. ग्रामस्थांची गर्दी पाहून तो तिथून निसटला असल्याचे बकरीचे मालक संतोष काप यांनी सांगितले.

Exit mobile version