रोहिंजन येथील गोदामाला आग

| पनवेल | वार्ताहर |

रोहिंजन गाव परिसरात असलेल्या एका गोदामाला आग लागण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.

पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग अ परिसरात असणाऱ्या ग्रामीण भागात विविध प्रकारच्या साहित्याची साठवणूक करणाऱ्या गोदामांची संख्या मोठी या मध्ये धान्य साठवणूक करणाऱ्या गोडामांचा समावेश असून, मुंब्रा पनवेल महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारील भल्ला वेअरहौसिंग कॉम्प्लेक्स मधील गोदामाचा देखील समावेश आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र गोदमात ठेवण्यात आलेल्या वीस कंटेनर मधील सनफ्लॉवर केकच्या गोणी आगीत जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर सिडको अग्निशमन दलाची तीन वाहने आणि 13 कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे आग लागण्याची घटना घडली असल्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version