सराईत सोनसाखळी चोरांना अटक

पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

| पनवेल | वार्ताहर |

खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास 4 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

फिर्यादी रोशनी झेंडे ह्या वडील व बहिणीसह खारघर सेक्टर 12 येथील बँक ऑफ बडोदा याचे समोरील रोडवरुन पायी चालत जात असताना समोरुन आलेल्या मोटार सायकलवरील वरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळयातील 75 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरी चोरी करून पळून गेले. तसेच अशाच प्रकारे कुमुदीनी अहिरे ह्या खारघर सेक्टर 4 येथील रेलविहार येथे मैत्रिणीसोबत बोलत असताना मागील बाजुने अनोळखी इसमाने त्यांच्या गळयातील पावणेदोन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरी चोरी करून पुढे मोटार सायकलवर उभा असलेले साथीदारा सोबत पळुन गेला होता. या दोन्ही घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आले होती.

पोलीस पथकाने सदर गुन्हयात तांत्रिक तपासाचे आधारे एका आरोपीला कल्याणमधील अबिवली येथून ताब्यात घेतले. अशाच प्रकारे दुसर्‍या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खारघर परिसरातील केलेल्या गुह्यांची कबुली दिली.

Exit mobile version