कराटेमध्ये विहानला सुवर्ण

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान फेडरेशन यांच्या वतीने दि. 27 ते 29 मेदरम्यान बारामती येथे कराटे चॅम्पियनशिप खेळविली गेली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना श्रीवर्धन येथील चॅम्पियन्स कराटे क्लबच्या विहान दर्शन विचारे याने 6 ते 8 ग्रुप व वजन 25 कि.चे आतील गटामध्ये सुवर्णपदक मिळवून उज्ज्वल कामगिरी केली आहे.
देशभरातून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आसाम, मिझोरम, दीव दमण, गोवा इ. ठिकाणांहून सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. शिहान सत्यजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीचे दोन दिवस ट्रेनिंग आणि नंतर स्पर्धा असा एकूण सहा दिवसांचा कार्यक्रम आखण्यात आला होता.
विहान याच्या या उत्तम यशाबद्दल रायगडमधून त्याच्यावर सर्वत्र अभिनंदन होत आहे. विहान याच्या या उत्तम खेळाचे श्रेय चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक सेंसेई संतोष मोहिते, श्रीवर्धन शाखेतील प्रशिक्षक अविनाश मोरे, प्रसाद विचारे, रितेश मुरकर यांना जाते.

Exit mobile version