। पनवेल । वार्ताहर ।
निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांच्या रॅली दरम्यान तिघा जणांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मणी मंगळसूत्र चोरीला गेल्या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जय चंद्रन के वासू हे सेक्टर 12, नवीन पनवेल या ठिकाणी राहत असून व्हीके हायस्कूल, पनवेल येथे मतमोजणीच्या ठिकाणी आले होते. उमेदवार निवडून आल्याने प्रभागातील लोकांनी वडाळे तलाव या ठिकाणी रॅली काढली. रॅली चालू असताना त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन गळ्यामध्ये मिळून आली नाही. रॅलीमध्ये शोध घेतला मात्र ती सापडली नाही. याच दरम्यान रॅलीमध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या शैला चनवीर यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरीला गेले. तसेच निलेश पगारे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन चोरीला गेली.





