| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील अमृता ज्ञानेश्वर भगत हिने राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. राजस्थान राज्यातील श्री गंगानगर येथे राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा खेळविली गेली होती.
राष्ट्रीय पॉवरलिफ्टींगपटू अमृता भगत हिने राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सब ज्युनियर गटात सहभाग घेतला. महारष्ट्र राज्याच्या संघातून खेळणाऱ्या या रायगड पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशनकडून सहभागी झाली होती. राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सब ज्युनियर गटात अमृता हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. जगातील सब ज्युनियर स्पर्धेतदेखील अमृता हिने पदकाची कमाई केली होती. राजस्थान राज्यातील श्री गंगानगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत अमृता आपले प्रशिक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह सहभागी झाली होती.