अंचित शुलीला सुवर्णपदक

नवी दिल्ली,वृत्तसंस्था

युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंत शुलीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसर्‍या सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 143 किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. त्यानेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 170 किलोसहीत एकूण 313 किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रम आपल्या नावे करुन घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन अंचितचं अभिनंदन केलं आहे.

Exit mobile version