महेश वेळे यांना सुवर्ण पदक

। मुंबई। प्रतिनिधी |
मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबागतर्फे अलिबाग येथील कोको-मँगो हॉटेल येथे बॉलीवूड विषयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्ञानविर्धनी एज्युकेशन सोसायटीचे डॉ. महाडिक, मनिषा महाडिक, निमिष परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हॉटेल-महेश वेळे यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आला.

मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तसेच प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कॉलेजचे प्राचार्य तुषार गांगुर्डे यांनी मार्गदर्शन व सूत्रसंचालन केले.

Exit mobile version