सुभाष पुजारी यांना सुवर्णपदक

मि. एशिया बॉडीबिल्डिंग स्पर्धा
| पनवेल | वार्ताहर |

54 वी मि.एशिया बॉडीबिल्डिंग कॉम्पोटीशनमध्ये पळस्पे महामार्ग पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावल्याने पोलीस दलासह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

मालदीव येथे 54 वी मि.एशिया बॉडीबिल्डिंग 2022 स्पर्धा सुरु असून, दि.15 ते 21 जुलैदरम्यान चालणार्‍या या स्पर्धेत 80 किलो गटामध्ये पळस्पे महामार्ग पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशाने महाराष्ट्र पोलीस दलासह भारताचे नाव उंचावले आहे. सुभाष पुजारी यांच्यावर पोलीस दलासह पनवेलकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Exit mobile version