सोन्याचे दागिने लुटले

| महाड | प्रतिनिधी |

एक अज्ञात इसम महाड मधील काजळ पुरा परिसरातील एका दुकानातून महिलेच्या अंगावरील 72 हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 9 सप्टेंबर रोजी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रजनी राजाराम कदम, रा.काजलपुरा महाड यांचे किराणा मालाचे दुकान आहे. सकाळी एक अज्ञात इसम या दुकानात आला आणि त्यांने या महिलेला सांगितले की तुमच्या आळीतील सार्वजनिक गणपतीसाठी फुलांचा हार आणि प्रसादा साठी बिस्किटे आणली आहेत. सध्या गणपती दर्शन बंद असून दर्शन सुरू झाल्या नंतर हार व प्रसाद त्या ठिकाणी तुम्ही द्यावा असे सांगत विश्‍वास संपादित केला. तसेच तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने व हातातील अंगठी काढून या हाराला लावा म्हणजे माझ्या सोन्याच्या दुकानाची भरभराटी होईल. महिलेने आपले सर्व दागिने हाराला लावले असता अचानक डोळ्यांची आग होऊ लागल्याने महिलेचे दागिर्‍यांकडे दुर्लक्ष झाले. या संधीचा फायदा हा अज्ञात इसम महिलेचे 72 हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.

Exit mobile version