| बाकू, (बुडापेस्ट) | वृत्तसंस्था |
भारतीय नेमबाजांनी रविवारी अखिल शेवरानच्या कास्यपदकांसह आणखी दोन सुवर्णपदके कमावली. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारताच्या खेळाडूंनी 1750 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. भारताच्या या संघात अखिल शेवरान, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व नीरजकुमार या खेळाडूंचा समावेश होता. भारताच्या महिला तिरदांजांनीही ठसा उमटवला. मनू भाकर, रिदम सांगवान, इशा सिंग या भारताच्या त्रिमूर्तींनी 1744 गुणांची कमाई करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
स्कीट मिश्र सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांना अपयशाला सामोरे जावे लागले. अंगद बाजवा व पारीनाज धालीवाल तसेच अनंत नारुका – गनिमत सेखो या जोड्यांना पदकांपासून दूरच राहावे लागले. अनंत – गनिमतची 25व्या स्थानावर, तर अंगद – पारीनाजची 37व्या स्थानावर घसरण झाली. जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये चीनच्या नेमबाजांचे पहिले स्थान कायम आहे. चीनच्या नेमबाजांनी सात सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझ अशी एकूण 13 पदकांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले आहे. तसेच भारताने एकूण सहा पदकांसह दुसरे स्थान मिळवले आहे. यामध्ये तीन सुवर्ण व तीन ब्राँझपदकांचा समावेश आहे. अमेरिका दोन सुवर्ण व एक रौप्यपदकासह तिसर्या स्थानावर आहे.
पाचवा कोटा मिळवला
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये होणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवासाठी भारताने आतापर्यंत पाच कोटा मिळवले आहेत. याआधी रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे व भाऊनीश मेंडीरट्टा यांनी ऑलिंपिक कोटा मिळवला होता. आता पॅरिस येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये मेहुली घोष हिच्यानंतर रविवारी अखिल शेवरान यानेही दमदार कामगिरी करीत भारतासाठी कोटा मिळवला.