एव्ही डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

डान्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ भारत यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या 11 वी राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2023-24 ही दि. 6 व 7 जानेवारी रोजी मध्यप्रदेश खंडवा श्री किशोर कुमार रंगभूमी येथे पार पडली.

या स्पर्धेत रायगड येथील सुप्रसिध्द एव्ही डान्स स्टुडिओचे विद्यार्थी राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत 200 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होतो. ज्युनिअर ड्युयेट 14 वर्षे खालील गटामध्ये अस्था प्रमोद दळवी व वेधा विजय यादव या विद्यार्थीनींने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच, राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बेसेडर भारताला पहिले ऑस्कर पुरस्कार मिळून देणारे कमलेश पटेल यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण पदक देण्यात आले.

या विद्यार्थ्यांना एव्ही डान्स स्टुडिओचे अविनाश जोरे यांनी उत्तम दर्जाचे नृत्य दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन केले. या स्पर्धेकरिता राष्ट्रीय कोच व डायडाज स्टुडिओचे संचालक व महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरज विलास जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version