श्रीवर्धनच्या विद्यार्थ्यांचे ‘सुवर्ण’ यश

Martial arts fighter

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या विद्यमाने तसेच कराटे असोसिएशन महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे स्पर्धेचे सोमवारी (दि.28) पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रीवर्धन चॅम्पियन्स कराटे क्लबचे विद्यार्थी स्मरणिका गणेश भुते आणि विहान दर्शन विचारे या दोघांनी कुमिते या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. आता या दोन्ही खेळाडूंची दिल्ली येथे होणार्‍या किओ राष्ट्रीय मान्यताप्राप्त स्पर्धेकरीता निवड झालेली आहे.

महाराष्ट्रातील कराटे खेळाच्या क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या या स्पर्धेतील सुवर्ण खेळाडू स्मरणिका व विहान यांच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक अविनाश मोरे, रितेश मुरकर व प्रसाद विचारे तसेच संस्थेचे संस्थापक मुख्य मार्गदर्शक शिहान संतोष मोहिते यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाच वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लबने एकूण 15 सुवर्ण पदकं पटकावून सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देखील पटकावले आहे.

Exit mobile version