खुशखबर! अलिबागमध्ये इलेक्ट्रीक बजाज चेतकचा अवतार

 । अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिकडेच मोटर उत्पादन क्षेत्रात पुनरागमन करत बजाज ऑटोने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर चेतक बाजारात आणली आहे. तसेच बजाजने तब्बल 14 वर्षांनंतर आपल्या लोकप्रिय चेतक स्कूटरला पुन्हा एकदा जीवदान दिले आहे. अर्थातच आपल्या जुन्या स्कूटरहून वेगळा असा चेतकचा इलेक्ट्रिक अवतार अनेक शहरांमध्ये दाखल झाला आहे. मात्र अलिबागरांना ही गाडी खरेदी करण्यासाठी शहरात जाण्याची गरज पडू नये, याकरीता नमिता मोटर्स या शोरुमध्ये चेतक ही दुचाकी आधुनिक डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह ग्राहकांच्या भेटीला आली आहे.


या शोरुमचे उद्घाटन रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रदिप नाईक, वृषाली ठोसर, सत्यजीत दळी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अजय झुंजारराव, मिलींद चव्हाण, रवि थोरात, अमित नारे आदी उपस्थित होते.


अलिबागमध्ये नव्याने दाखल होणारी चेतक दुचाकी आधुनिक आहे. तिची बॉडी मेटल असून, चावी रिमोटची आहे. या दुचाकीला रिव्हर्स सिस्टीम आहे. युएसबी, औषधोपचार कीट ठेवण्याची व्यवस्था आहे. सुमारे 1 लाख 23 हजार रुपयांपासून दुचाकीची किंमत असून चार तासात बॅटरी चार्जींग होते. काळ्या रंगासह निळे व अशा वेगवेगळ्या रंगाच्या दुचाकी नमिता मोटर्समध्ये उपलब्ध असल्याची माहिती तेथील व्यवस्थापकांनी दिली.

Exit mobile version