सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटरचा खप वाढताना दिसत आहे. आपण अशा ई-स्कूटर्सबद्दल माहिती घेऊयात जे सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि त्यांच्या पावर आणि परफॉर्मंसने सर्वांची मने जिंकत आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या रेंज सोबतच बजेट फ्रेंडली देखील आहेत.भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बेस्ट इलेक्ट्रक स्कूटर ऑप्शन्स पाहूयात..
ही इलेक्ट्रीक स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकते. Ather 450X या स्कूटरमध्ये तुम्हाला 2.9kWh बॅटरी पॅक मिळतो. तसेच ही देशातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असल्याचे मानले जाते. तुम्ही ही स्कूटर 5 तासांत पूर्णपणे चार्ज करू शकता. एका चार्जमध्ये हे स्कूटर 60-85 किमी/तास चालते.
Ola S1 Pro
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत- 1,10,149 (एक्स-शोरूम)असून यामध्ये तुम्हाला बॅटरी पॅक- 3.97kWh चा मिळतो. तसेच ही स्कूटर एकदा चार्ज केल्यास 130-180 किमीची रेंज देते. दरम्यान याची बॅटरी चार्ज होण्यासाठीचा चार्जिंग वेळ – 6.5 तास असून टॉप स्पीड ही 115 किमी प्रतितास इतकी आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिक
किंमत-1,47,775 (एक्स-शोरूम)
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 3kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 4.8kW मोटरला पावर देतो. ही मोटर 16Nm पीक टॉर्क आणि 6.44bhp पॉवर जनरेटकरते. कंपनीच्या दाव्यानुसार, बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडमध्ये 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. जर आपण चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाले तर सामान्य 5A पॉवर सॉकेटद्वारे ते 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकते, तर ते फक्त 1 तासात 25 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकते, परंतु सध्या यासाठी कोणतीही फास्ट चार्जिंग सिस्टम दिलेली नाही.
TVS iQube
किंमत- 1,15,000 (एक्स-शोरूम)
TVS iQube मध्ये 4.4kW ची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर आहे जी 140 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 40 kmph चा वेग पकडते. जर आपण या स्कूटरच्या टॉप स्पीडबद्दल बोललो तर ती 78 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर एका चार्जवर कमाल 75 किमीचा पल्ला गाठू शकते.