एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! पगारासाठी 300 कोटींचा निधी मंजूर

। मुंबई । प्रतिनिधी ।
नवीन वर्षात येणार्‍या पहिल्याच सणासुदीच्या तोंडावर अखेर एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. एसटी कर्मचार्‍यांचा थकलेला पगार हा आजच होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारकडून तातडीने 300 कोटी वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आजच सर्व कर्मचार्‍यांचा पगार होईल अशी आशा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळ कर्मचार्‍यांचे दर महिन्याला 7 तारखेला वेतन होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवट्यामुळे वेतन वेळेत होत नाही. 7 ते 10 या तारखेपर्यंत पगार देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती. मात्र अजूनही वेतन वेळेत होत नाही, त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.

Exit mobile version