| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मंजुरी दिलीय. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलीय. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच सुद्धा या लसीमध्ये योगदान आहे. मलेरियावरील ही दुसरी व्हॅक्सीन आहे. या व्हॅक्सीनला R21/Matrix-M नाव देण्यात आलंय.
ही व्हॅक्सीन पहिल्या व्हॅक्सीनच्या तुलनेत जास्त प्रभावी असल्याचं म्हटल जातंय. ही लस मुलांवर जास्त प्रभावी आहे. या व्हॅक्सीनची आता निर्मिती सुरु होईल. मलेरियाच्या पहिल्या लसीला 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती. याला आरटीएसएस नाव देण्यात आलं होतं. आता मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मंजुरी मिळालीय.
जीटीबी हॉस्पिटलचे डॉ. अंकित कुमार म्हणाले की, R21/Matrix-M व्हॅक्सीन थेट स्पोरोजोइट्सवर परिणाम करते. हे स्पोरोजोइट्स मलेरियाच्या इन्फेक्शनचे एंट्री पॉइंट्स आहेत. मलेरियाच्या व्हायरसने शरीरात प्रवेश करताच ही व्हॅक्सीन सुरुवातीलाच व्हायरसला संपवेल.
एखादी लस आजाराचा प्रभाव सुरुवातीलाच संपवणार असेल, तर ते खूपच चांगलं आहे. सध्या ही लस आफ्रिकी देशांमध्ये वापरली जाईल. सध्या लहान मुलांसाठी या लसीला मान्यता देण्यात आलीय. मलेरियाची जी पहिली लस आली होती, त्यापेक्षा आर 21 जास्त प्रभावी आहे.
ट्रायलमध्ये जास्त फायदा दिसून आला. व्हॅक्सीनचे कमीत कमी दोन डोस घेण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. अंकित यांनी सांगितलं. सफदरजंग हॉस्पिटलमधील डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं की, या व्हॅक्सीनच्या मदतीने मलेरियामुळे मृत्यूदर कमी करता येईल. खासकरुन लहान मुलांसाठी ही व्हॅक्सीन फायद्याची ठरेल.