धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित विमल पानमसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोघांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज कुमार जगत दास (19) व मोहम्मद बिलाल मोहम्मद कासिम (21) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार रणजितसिंह खराडे यांना प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाईचे नियोजन करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोघांकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित विमल पानमसाला व सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version