| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील कुंभारआळी येथील श्री गणपती- हनुमान मंदिरात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा बुधवारी (दि.15) समाज बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात उन्नती महिला मंडळ यांच्याकडून सकाळी 5.00 वाजता घेण्यात आलेल्या काकड आरतीने झाली. त्यानंतर सकाळी 8.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, संत महंतांच्या विविध वेशभूषा व वस्त्रे अलंकार परिधान केलेल्या लहानग्यांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभाग घेतला होता. श्री संत गोरोबाकाका यांचा हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व उन्नती महिला मंडळ, कुंभारआळी यांनी अपार मेहनत घेतली. या सोहळ्याला राजिपचे सदस्य सुमित काते, नरेंद्र जैन, भाई टके, किशोर जैन, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, शरद वाडेकर, मोहन नागोठणेकर, बाळासाहेब टके, डॉ. मिलिंद धात्रक, संतोष नागोठणेकर, अमृता महाडिक, ज्योती राऊत यांच्यासह नागोठणे शहर व परिसरातील मान्यवरांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.







