अलिबाग । सिद्धी भगत |
संसाराचं जातं पुढे ओढणार्या स्त्रीया आपल्या कुटुंबाचे संरक्षण तत्परतेने करत असतात, आयुष्याच्या खडतर वळणावर जेव्हा याच महिलांना एकमेकांची साथ मिळते तेव्हा ही नारीशक्ती काहीतरी नवं उदयास आणते.असाच अनुभव नवगावमधील महिलांना आला आहे.
अलिबाग तालुक्यातील नवगाव गावात राहणार्या रूपाली कवळे यांना गावातील महिलांची साथ मिळाली व या महिलांना घेऊन रूपाली यांनी काही वर्षांपूर्वी श्री कृपा स्वयम सहाय्यता महिला बचत गट स्थापन केला. सुरूवातीला या सर्व महिलांना छोटया मोठया संकटांना सामोरे जावे लागले परंतु म्हणतात ना इच्छाशक्ती असेल तर संकटातून मार्ग सापडायला वेळ लागत नाही. तसेच रूपाली कवळे यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना खंबीरपणे संकटांचा सामना करायला शिकवले असे म्हणता येईल.
दिवाळीमध्ये फराळ हा सर्वांच्याच आवडीचा विषय. परंतु नोकरी करणार्या अनेक महिलांना अपुर्या पडणार्या वेळेमुळे फराळ करणे शक्य होत नाही. म्हणूनच महिला बचतगटांमार्फत दिवाळीचा घरगुती पद्धतीचा फराळ तयार करून त्याची विक्री बाजारात केली जाते. असाच दिवाळीसाठी लागणारा फराळ तयार करून त्या फराळाच्या विक्रीचा उपक्रम श्री कृपा स्वयम सहाय्यता महिला बचतगटामार्फत राबवला जात आहे. साधारण 15 दिवसांआधी सर्व फराळाची तयारी सुरू केली जाते व दिवाळीच्या पाच दिवस आधी सर्व पदार्थ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. काही ठिकाणी अनेक बचतगट एकत्र येऊन स्टॉल लावले जातात व दिवाळीच्या वस्तुंची विक्री केली जाते. श्री कृपा बचत गटामार्फत दिवाळी स्पेशल म्हणून चकल्या, चिवडा, करंज्या व नानकट या वस्तु अधिक प्रमाणात बनवल्या जातात.
अध्यक्ष रूपाली कवळे यांच्या बचतगटात श्वेता कवळे, पुनम कवळे, स्नेहा कवळे, सोनल शेळके, सुरेखा पाटील, सायली कवळे, श्वेता अमोल कवळे, रूचिता कवळे, व हर्षला अशा एकूण 10 महिला कार्यरत आहेत.फराळाची ऑर्डर देण्यासाठी या नंबरवर संपर्क साधावा ः- रूपाली कवळे – 9765900318 / 7798232755
दिवाळी सणाव्यतीरिक्त या महिला पापड, लोणची, तीळगुळ, पोळ्या, जेवणाच्या ऑर्डस घेत असतात. येणार्या संकटांवर मात करत व कुटुंबाचा धैर्याने सांभाळ करत आम्ही सर्व महिला एकत्र येऊन यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करत आहोत.
रुपाली कवळे,श्रीकृपा बचत गट