बुलढाणा | प्रतिनिधी |
मंगळवारी सकाळच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-खामगाव रोडवर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले असून 4 जण जखमी झाले आहेत. वैरागड फाट्यावर आज सकाळी हा विचित्र असा तिहेरी अपघात घडला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी तीन वाहनामध्ये विचित्र अपघात झाला. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनची पोती घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणार्या महावितरण कंपनीच्या सुमो गाडीला त्यांनी धडक दिली. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.