चिकनचे दर वाढल्याने खवय्यांची पाठ

| नागोठणे | वार्ताहर |

सध्या सर्वच गोष्टींमध्ये महागाईचा भडका उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच महागड्या मटणाला पर्याय म्हणून सर्वसामान्यांचा आवडता व स्वस्त मांसाहार असलेल्या चिकनचे दर 280 ते 300 रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे चिकन खवय्यांनी चिकनच्या दुकानांकडे पाठ फिरविल्याने चिकनच्या दुकानातही शुकशुकाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चिकनची दुकाने ही ओसाड पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सध्या महागाईच्या काळात सर्व सामान्य जनतेला जीवन कसे जगायचे असा प्रश्‍न पडला आहे. दिवसेंदिवस महागाई ही वाढतच चाललेली आहे. अनेक वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात गगनाला भिडले आहेत. सध्याची सुरू असलेली वातावरणातील वाढती उष्णता पाहता चिकनचे दर हे कमी होतील असे वाटत असताना ऐन गरमीच्या वेळेतच चिकनचे दर हे 200 रुपयांवरून थेट 280 ते 300 च्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे चिकन खाणार्‍या शौकिनांच्या तोंडाला नक्कीच कात्री बसली असून, चिकन विक्रेत्यांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे.

चिकनचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहकांनी चिकनच्या दुकानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकन व्यावसायिक संकटात सापडले आहेत. यापुढे चिकनचा व्यवसाय करायचा की नाही असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे.

देवजी हंबीर,
चिकन विक्रेते,
सुकेळी
Exit mobile version