शासन आपल्या दारी कार्यक्रम

यशस्वीततेसाठी योगदान द्यावे

| रायगड | वार्ताहर |

शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शुक्रवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी दु.12.30 वा माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील हा कार्यक्रम सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार, दिव्यांग यासह विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणार्‍या शासकीय योजनांचे लाभ विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी केले आहे.

Exit mobile version